Pradnya Nikam
बेड गरम ठेवणारी Smart Heated Blanket!
रात्रभर वापरल्यास किती वीज खाते? जाणून घ्या एका रात्रीचा आणि महिन्याचा खर्च!
काय आहे Smart Heated Blanket?
ही साधी ब्लँकेट नसून त्यामध्ये खास हीटिंग वायर असतात. वीज सुरू केल्यावर या वायर गरम होतात आणि ब्लँकेटला उब मिळते.
किती वॅटची असते ही ब्लँकेट?
मॉडेलनुसार Heated Blanket साधारण 40 ते 150 वॅट किंवा त्याहून अधिक पॉवरची असू शकते. मोठ्या ब्लँकेटचा वीज वापर तुलनेने जास्त असू शकतो.
एका तासात किती वीज खाते?
100 वॅटची ब्लँकेट एका तासात पूर्ण क्षमतेने सुरू असल्यास 0.1 युनिट वीज वापरते. म्हणजेच 10 तासांत 1 युनिट वीज खर्च होऊ शकते.
8 तास वापरल्यास किती युनिट?
समजा, तुमची ब्लँकेट 100 वॅटची आहे आणि तुम्ही ती 8 तास वापरता.
100 × 8 ÷ 1000 = 0.8 युनिट
म्हणजे एका रात्रीत अंदाजे 0.8 युनिट वीज वापरली जाऊ शकते.
एका रात्रीचा खर्च किती?
वीज दर ₹8 प्रति युनिट गृहीत धरल्यास 0.8 युनिटसाठी फक्त ₹6.40 खर्च येईल.
म्हणजे 100 वॅटची ब्लँकेट 8 तास पूर्ण क्षमतेने वापरल्यास एका रात्रीचा खर्च साधारण 6 ते 7 रुपये!
महिन्याला किती वाढेल वीजबिल?
दररोज 8 तास ब्लँकेट वापरल्यास:
एका रात्रीचा वापर: 0.8 युनिट
30 दिवसांचा वापर: 24 युनिट
8 प्रति युनिट दराने खर्च: 192
म्हणजे महिन्याला अंदाजे 192 रुपये खर्च होऊ शकतात.
Room Heater पेक्षा कमी वीज?
Heated Blanket थेट बेड आणि शरीराला उब देते. तर Room Heater संपूर्ण खोलीतील हवा गरम करतो.
Smart Blanket वापरताना ही काळजी घ्या!
ब्लँकेट वापरण्यापूर्वी वायर किंवा कंट्रोलर खराब नसल्याची खात्री करा. टाइमर आणि ऑटो शट-ऑफ फीचर असल्यास त्याचा वापर करा.