थंडीत गरम पाण्याची कमी पडणार नाही! 15L की 25L, कोणता Geyser तुमच्यासाठी योग्य?

Pradnya Nikam

कोणता पर्याय निवडावा?

थंडी वाढली की गरम पाण्याची गरजही वाढते. पण घरासाठी गिझर खरेदी करताना 15 लिटर की 25 लिटर, कोणता पर्याय निवडावा?

Geyser | Pinterest

15L Geyser कोणासाठी?

घरात 1 ते 3 व्यक्ती असतील आणि प्रामुख्याने बाथरूममध्ये अंघोळीसाठी गरम पाणी लागत असेल, तर 15 लिटरचा गिझर उपयोगी ठरू शकतो.

Geyser | Pinterest

25L Geyser कधी घ्यावा?

घरात 4 ते 5 किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य असतील, तर 25 लिटरचा गिझर अधिक सोयीचा ठरू शकतो. विशेषतः एकामागून एक अंघोळ करताना.

Geyser | Pinterest

पाण्याचा वापर किती होतो?

शॉवर, बादलीने अंघोळ किंवा गरम पाण्याचा जास्त वापर यानुसार गरज बदलते. कमी वेळात जास्त गरम पाणी हवे असल्यास मोठी क्षमता फायदेशीर ठरू शकते.

Geyser | Pinterest

15L Geyser चे फायदे

कमी जागा व्यापतो, साधारणपणे कमी पाणी गरम करतो आणि लहान कुटुंबासाठी योग्य ठरू शकतो. मात्र सलग जास्त गरम पाणी वापरल्यास पुन्हा गरम होण्याची वाट पाहावी लागू शकते.

Geyser | Pinterest

25L Geyser चे फायदे

मोठ्या कुटुंबासाठी अधिक गरम पाण्याचा साठा उपलब्ध होतो. वारंवार पाणी गरम होण्याची वाट पाहण्याची गरज कमी होऊ शकते.

Geyser | Pinterest

वीज बिल कोणाचं जास्त?

15L आणि 25L गिझरमध्ये वीज वापर हा फक्त क्षमतेवर ठरत नाही. पाण्याचे तापमान, वापराचे प्रमाण, थर्मोस्टॅट आणि इन्सुलेशन यांचाही परिणाम होतो. मोठा गिझर पूर्ण भरून गरम केल्यास अधिक ऊर्जा लागू शकते.

Geyser | Pinterest

खरेदीपूर्वी हे तपासा

गिझरचा वॅटेज, स्टार रेटिंग, प्रेशर रेटिंग, वॉरंटी आणि घरातील पाण्याचा दाब तपासा. योग्य क्षमतेचा गिझर निवडण्यासाठी घरातील सदस्य आणि रोजचा वापर लक्षात घ्या.

Geyser | Pinterest

मग 15L की 25L?

लहान कुटुंब आणि मर्यादित वापरासाठी 15L गिझर योग्य ठरू शकतो. मोठे कुटुंब किंवा जास्त गरम पाण्याची गरज असल्यास 25L पर्यायाचा विचार करा. योग्य निवड म्हणजे गरजेनुसार क्षमता!

Geyser | Pinterest