झोपताना डोळ्यांवर लावतात हा स्मार्ट मास्क; काय आहेत फायदे?

Pradnya Nikam

झोपेसाठी स्मार्ट गॅझेट!

डोळ्यांवर लावून झोपता येणारा Smart Sleep Mask केवळ प्रकाश रोखत नाही, तर काही मॉडेल्समध्ये म्युझिक, व्हायब्रेशन आणि स्लीप ट्रॅकिंगसारखे फीचर्सही मिळतात.

Smart Sleep Mask

काय आहे Smart Sleep Mask?

Smart Sleep Mask हा इलेक्ट्रॉनिक फीचर्स असलेला विशेष आय मास्क असून तो झोपेच्या वेळी आरामदायी वातावरण तयार करण्यासाठी डिझाइन केला जातो.

Smart Sleep Mask

बाहेरील प्रकाश रोखतो!

या मास्कची खास रचना डोळ्यांभोवती बसते आणि बाहेरील प्रकाश रोखण्यास मदत करते, त्यामुळे अंधारात झोपणे सोपे होऊ शकते.

Smart Sleep Mask

म्युझिक ऐकत घेता येते झोप!

काही स्मार्ट मास्कमध्ये अल्ट्रा-थिन स्पीकर्स असतात, ज्यामुळे मोबाईलशी कनेक्ट करून मंद संगीत किंवा रिलॅक्सिंग ऑडिओ ऐकता येतो.

Smart Sleep Mask

व्हायब्रेशन अलर्टची सुविधा!

काही प्रगत मॉडेल्समध्ये हलक्या व्हायब्रेशनद्वारे अलार्म देण्याची सुविधा असते, त्यामुळे मोठ्या आवाजाशिवाय उठण्यास मदत होऊ शकते.

Smart Sleep Mask

स्लीप ट्रॅकिंगही करता येते!

काही स्मार्ट स्लीप मास्कमध्ये सेन्सर्सच्या मदतीने झोपेचा कालावधी आणि झोपेच्या पॅटर्नशी संबंधित माहिती ट्रॅक करण्याची सुविधा मिळते.

Smart Sleep Mask

डोळ्यांना मिळतो आराम!

काही मॉडेल्समध्ये हीटिंग फंक्शन असते, ज्यामुळे डोळ्यांच्या आसपास हलकी उब मिळते आणि विश्रांतीचा अनुभव घेता येतो.

Smart Sleep Mask

मोबाईल अ‍ॅपशी कनेक्टिव्हिटी!

Bluetooth आणि मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने काही स्मार्ट मास्कमधील संगीत, अलार्म आणि इतर सेटिंग्ज नियंत्रित करता येतात.

Smart Sleep Mask

खरेदी करताना काय पाहावे?

Smart Sleep Mask खरेदी करताना वजन, डोळ्यांवरील दाब, बॅटरी लाइफ, मटेरियल, ब्लूटूथ आणि हीटिंग फीचरची सुरक्षितता तपासणे महत्त्वाचे आहे.