5 सेकंदांत 100 चा वेग! Volkswagen ची नवी स्पोर्टी SUV चर्चेत

Pradnya Nikam

2027 Volkswagen T-Roc R

333 PS पॉवर आणि स्पोर्टी लूकसह Volkswagen ची नवी परफॉर्मन्स SUV चर्चेत!

Picture Credit:volkswagen

2.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन

या SUV मध्ये 2.0 लिटर EA888 evo5 टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे. 48V माइल्ड हायब्रिड तंत्रज्ञानामुळे इंजिनची कामगिरी अधिक प्रभावी होते.

Picture Credit:volkswagen

333 PS पॉवर, 420 Nm टॉर्क

या SUV चे इंजिन 245 kW म्हणजेच 333 PS पॉवर आणि 420 Nm टॉर्क निर्माण करते. त्यामुळे वेगवान ड्रायव्हिंगचा अनुभव मिळतो.

Picture Credit:volkswagen

फक्त 5 सेकंदांत 100 चा वेग!

T-Roc R अवघ्या 5 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडते. तिचा कमाल वेग इलेक्ट्रॉनिक पद्धतीने 250 किमी प्रतितास मर्यादित आहे.

Picture Credit:volkswagen

4MOTION ऑल-व्हील ड्राइव्ह

यात 7-स्पीड DSG गिअरबॉक्ससोबत 4MOTION AWD सिस्टम मिळते. R-Performance Torque Vectoring मुळे मागील दोन्ही चाकांमध्येही पॉवरचे वितरण नियंत्रित करता येते.

Picture Credit:volkswagen

ड्रायव्हिंगसाठी खास मोड्स

यात Race, Special आणि Drift असे ड्रायव्हिंग मोड्स आहेत. Special मोड Nürburgring ट्रॅकसाठी तयार करण्यात आला आहे. स्टीअरिंगवरील R बटणाने स्पोर्टी सेटिंग सक्रिय करता येते.

Picture Credit:volkswagen

चार एक्झॉस्ट आणि स्पोर्टी ब्रेक्स

यात चार एक्झॉस्ट टिप्स, निळ्या रंगाचे ब्रेक कॅलिपर्स आणि 19 इंच Zandvoort अलॉय व्हील्स मिळतात. पर्याय म्हणून 20 इंच फोर्ज्ड व्हील्सही उपलब्ध आहेत.

Picture Credit:volkswagen

केबिनमध्येही स्पोर्टी टच

SUV मध्ये R-Performance स्टीअरिंग व्हील, पॅडल शिफ्टर्स, स्पोर्ट्स सीट्स आणि डिजिटल कॉकपिट मिळते. निळ्या रंगाचे R लोगो आणि कॉन्ट्रास्ट स्टिचिंग केबिनला खास लूक देतात.

Picture Credit:volkswagen

किंमत किती आणि भारतात येणार का?

जर्मनीमध्ये या SUV ची सुरुवातीची किंमत 59,995 युरो आहे. प्री-सेल 20 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. भारतातील लॉन्चबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

Picture Credit:volkswagen

पुढे वाचा

कारच्या बॅटरीवर पांढरी पावडर का जमा होते? दुर्लक्ष केल्यास होऊ शकते मोठे नुकसान!