Tubeless Tyre मधील Air Leakage कसे ओळखाल? जाणून घ्या सोपी पद्धत!

Pradnya Nikam

खिळा किंवा टोकदार वस्तू

रस्त्यावरील खिळा, स्क्रू किंवा काच टायरमध्ये घुसल्यास छोट्या छिद्रातून हवा हळूहळू बाहेर पडू शकते.

Picture Credit:pinterest

व्हॉल्व्हमधून हवा गळणे

टायरमध्ये हवा भरण्यासाठी असलेल्या व्हॉल्व्हचा कोअर सैल झाला किंवा खराब झाला, तर तिथून हवा लीक होऊ शकते.

Picture Credit:pinterest

रिम आणि टायरमधील फट

रिम वाकला, खराब झाला किंवा त्यावर गंज जमा झाला तर टायरची सीलिंग व्यवस्थित होत नाही. परिणामी हवा बाहेर पडू शकते.

Picture Credit:pinterest

टायरच्या बीडमधून गळती

टायरचा बीड म्हणजे रिमला घट्ट पकडून ठेवणारा कडा. हा भाग खराब किंवा व्यवस्थित बसलेला नसल्यास हवा लीक होते.

Picture Credit:pinterest

टायरच्या बाजूला क्रॅक

टायरच्या साइडवॉलवर भेगा, कट किंवा नुकसान झाल्यास हवा बाहेर पडू शकते. अशा प्रकारचे नुकसान दुर्लक्षित करू नका.

Picture Credit:pinterest

व्हॉल्व्हच्या बेसमधून गळती

व्हॉल्व्हच्या तळाशी असलेले रबर खराब झाले किंवा त्याची फिटिंग सैल झाली तर तिथूनही हवा बाहेर जाऊ शकते.

Picture Credit:pinterest

तापमानातील बदल

थंडीमध्ये टायरमधील हवेचा दाब कमी होऊ शकतो. प्रत्येक वेळी हवा कमी होणे म्हणजे पंक्चरच असेल असे नाही.

Picture Credit:pinterest

हवा कुठून लीक होते हे कसे ओळखाल?

टायरवर साबणाचे पाणी लावा. ज्या ठिकाणी सतत बुडबुडे तयार होतात, तिथून हवा गळत असल्याची शक्यता असते. गळती आढळल्यास मेकॅनिककडून तपासणी करून घ्या.

Picture Credit:pinterest

पुढे वाचा

AC Motor की BLDC Motor? इलेक्ट्रिक बाईकसाठी कोणती टेक्नॉलॉजी ठरते बेस्ट?