१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून अत्याचार , पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पीडित १५ वर्षीय मुलगी रात्री ८ वाजेच्या दरम्यान घराबाहेर निघाली होती. त्यावेळी या आरोपी नराधमाने बळजबरीने तिचा हात पकडून घरामागे नेवून तिच्यावर अत्याचार केले.

    अमरावती : अमरावती जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  पीडित १५ वर्षीय मुलगी रात्री ८ वाजेच्या दरम्यान घराबाहेर निघाली होती. त्यावेळी या आरोपी नराधमाने बळजबरीने तिचा हात पकडून घरामागे नेवून तिच्यावर अत्याचार केले. रात्री बराच वेळ झाला तरी मुलगी अजून घरी आली नाही म्हणून आईने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा मुलगी घरामागे रडत असल्याचे आढळून आले.

    आरोपीचे नाव हरी उर्फ दिवाकर कराळे असे आहे. आईने जेव्हा मुलीची विचारपुस केली तेव्हा तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. हे सर्व ऐकून कुटुंबाला जबर धक्का बसला. मुलीच्या आईने तात्काळ खोलापूर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली. आरोपीला पोलिसांकडून पोस्कोसह विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खोलापूर पोलीस करत आहेत.