१८ वर्षीय तरुणीवर बलात्कार; नराधम गोठ्यात नेऊन करायचा कुकृत्य  

 अमरावती. जिवे मारण्याची धमकी देऊन तांदूळ व्यापाऱ्याने एका १८ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना ३० सप्टेंबर रोजी गाडगेनगर हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी अजीज खान बिस्मिला खान (४२, विलास नगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. अजीज खान याचे तांदळाचे दुकान असून, त्याच्या दुकानात १८ वर्षीय तरुणी तांदूळ विकत घेत होती.

दरम्यान अजीज खान तिला ५ ते १० रुपये देत होता. एकदा तरुणीला एकटे पाहून अजीज खानने तिला जनावरांच्या गोठ्यात नेले. तिला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. शारीरिक संबंध न ठेवल्यास बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यावर पाचवेळा लैंगिक अत्याचार केला. या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने घटनेची माहिती नातेवाईकांना दिली. त्यानंतर तिने गाडगे नगर पोलिसात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात पोलिस कोठडीची मागणी केली.