soyabean farm

शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या सोयाबीनवर यावर्षी अतिपावसामूळे संक्रात आली आहे.ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबिनची कापणी शिल्लक आहे,त्यांना कोंब फुटायला सुरवात झाली आहे. कापणीनंतर गंजी लागलेले सोयाबीन पावसामूळे ओले झाल्याने काळे पडले आहे.

टाकरखेडा संभू (अमरावती). शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या सोयाबीनवर यावर्षी अतिपावसामूळे संक्रात आली आहे.ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबिनची कापणी शिल्लक आहे,त्यांना कोंब फुटायला सुरवात झाली आहे. कापणीनंतर गंजी लागलेले सोयाबीन पावसामूळे ओले झाल्याने काळे पडले आहे.

अतिवृष्टीचा जबर फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात एकरी 7 ते 8 पोत्यांची घट होणार आहे.
भातकुली तालुक्यात ५० हजार ४९८ हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. भातकुली तालुक्यात ३० हजार १३२ हेक्टरवर सोयाबिनचे नियोजन कृषी विभागाने केले होते.यापैकी २६ हजार ३९४ हेक्टरवर तालुक्यात सोयाबिनची पेरणी करण्यात आली. दरवर्षी तालुक्यात सोयाबिनची सर्वाधिक पेरणी केली जाते. परंतु यावर्षी शेतकऱ्यांनी कपाशीला पहिली पसंती दिली.

त्यामुळे तालुक्यात केवळ ८७ टक्के शेतकऱ्यांनी सोयाबिनची पेरणी केली होती. परंतु यावर्षी झालेल्या अतिपावसामुळे सोयाबीन उत्पादकांना चांगलाच फटका सहन करावा लागला. सुरूवातीला विविध रोगांचा प्रादुर्भाव सोयाबिन पिकावर झाला. त्यातुन कसेबसे सोयाबीनचे पिक सुधारली असताना शेतकऱ्यांनी कापणीला सुरूवातच केली होती. त्यात परतीच्या पावसाने सोयाबिनचे मोठे नुकसान केले. ज्यांचे सोयाबिन जमिनीत आहे, त्या सोयाबिनला कोंबे फुटायला सुरुवात झाली आहे. तर ज्यांनी सोयाबिनची कापणी करून गंजी लावली त्यांचे सोयाबीन पावसामूळे खराब होत आहे.

त्यांना कापणी मशीनमध्ये काढणे देखील कठीण झाले आहे. कारण याकरिता ओले झालेले सोयाबीन आधी सुकविणे गरजेचे आहे,परंतु ढगाळ वातावरणामुळे ते देखील शक्य नाही.परिणामी सोयाबिनचे उत्पन्न कमालीने घटत आहे.एकरी १० ते ११ पोते होणारे सोयाबीन आता एकरी दोन ते तीन पोत्यांवर आले आहे.त्यामुळे सोयाबीन उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे.