अमरावतीमध्ये क्रूझरच्या अपघातात ३ जण जागीच ठार

क्रूझर गाडी झाडावर आदळल्याने एकाच क्षणात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या भीषण अपघातामध्ये ३ पर्यांटक आणि ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. पर्यटक हे माळघाट फिरण्यासाठी गेले होते. घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

अमरावती : अमरावती (Amravati) जिल्ह्यात क्रूझरच्या अपघातात (cruiser accident ) तीन जण जागीच ठार (3 killed) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये हा भीषण अपघात घडल्यानंतर येथील परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या प्रकरणाची चौकशी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रूझर गाडी झाडावर आदळल्याने एकाच क्षणात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या भीषण अपघातामध्ये ३ पर्यांटक आणि ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. पर्यटक हे माळघाट फिरण्यासाठी गेले होते. घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

लॉकडाऊन दरम्यान हे तरूण फिरण्यासाठी गेले होते. परंतु परतत असताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आणि यामध्ये ३ मित्रांनी आपला जीव गमावला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून ३ मृतदेह ताब्यात घेतलं असून ते शवविच्छेदनासाठी येथील स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तसेच पुढील तपास पोलीस करत आहेत.