amaravati raped case

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार तीघांना अटक करण्यात आली आहे. तर एकजण फरार असल्याची माहिती मिळाली आहे. सुनील विष्णु राठोड(२७), दिनेश पानसिंग जाधव(३०) रतन अवधूत पाटील (२५) आणि समिर गुन्ह्यात सामीस अपराधी आहेत. यामधील समीर हा फरार असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

अमरावती : नोकरीचे आमिष दाखवून एका ३० वर्षीय युवतीला भेटायला बोलावून ४ नराधमांनी तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही घटना अमरावतीमध्ये (Amravati Rape case) एका गावात शेतीत (farm) घडली आहे. बडनेरा पोलिसांना या प्रकरणी चार नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार तीघांना अटक करण्यात आली आहे.(three men arrested)  तर एकजण फरार असल्याची माहिती मिळाली आहे. सुनील विष्णु राठोड(२७), दिनेश पानसिंग जाधव(३०) रतन अवधूत पाटील (२५) आणि समिर गुन्ह्यात सामीस अपराधी आहेत. यामधील समीर हा फरार असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

३० वर्षीय पीडीत तरुणी ही अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तासुक्यातील रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून ती भाड्याने अमरावतीमध्ये राहत आहे. रोजगारासाठी ती अमरावती राहत होती. तेव्हाच दुकानात काम करणाऱ्या समीर या तरुणाशी तिची ओळख झाली. परंतु काही कालांतराने तरुणीने दुकानातील काम सोडले होते.

याचाच फायदा घेत समीरने तिला फोन करुन दुकानात काम लावून देतो असे सांगितले. असे सांगून तिला अमरावतीच्या एका चौकात बोलाविले. तरुणी पोहचल्यानंतर समीर तरुणीला म्हणाला, आपल्याला ज्या दुकानत जायचे आहे. त्याला थोडा वेळ आहे. तोपर्यंत आपण माझ्या शेतात जाऊन येवू. त्यामुळे समीर सोबत युवती शेतात जाण्यास तायर झाली. परंतु शेतात अधीच ३ युवक उपस्थित होते.

शेतात पोहचल्यावर या चौघांनी तरुणीवर रात्री ८ वाजेपर्यंत सामूहिक अत्याचार केला. युवतीने कसाबसा आपली सुटका करुन थेट पोलीस स्थानक घाठले. आणि पोलीसांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी पोलीसांना ३ आरोपींना पकडण्यात यश आले आहे. तर एकाचा शोध सुरु आहे.