अमरावती जिल्ह्यात नव्या ८७ कोरोना बाधितांची भर

  • अमरावतीकर मात्र बिनधास्त

अमरावती. रॅपिड अँटिजन टेस्टच्या अहवालानुसार शुक्रवारी अमरावती (amravati) जिल्ह्यात आणखी ८७ नवे कोरोना बाधित (new corona positive) आढळले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. असे असले तरी अमरावतीकरांमध्ये मात्र याचे तिळमात्रही भय नाही.  रुग्णांची एकूण संख्या आता आठ हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. शहरातील बाजारपेठेत प्रचंड गर्दी दिसून येत असून, बहुतांश नागरिक नियमाचे उल्लंघन करताना आढळून येत आहेत. त्यामुळे शहर अनलॉकनंतर शहरात दररोज १००  ते २०० पेक्षा च्या संख्येने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.  बळीची संख्या  १७५ असून, अजुनही दीडशेवर नागरिक ऑक्सिजनवर तर ५० पेक्षा अधिक रुग्ण व्हेटिलेटरवर आहेत.