अमरावतीमध्ये ८८ नवे कोरोनाबाधित रूग्ण, चौघांचा मृत्यू

शनिवारी रात्रीपर्यंत आलेल्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ८८ झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. अमरावतीमध्ये एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ४ हजार ४२२ इतकी झाली आहे.

संपूर्ण देशभरासह राज्यातील काही भागांत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने होत आहे. अमरावतीमध्ये आज रविवारी ८८ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. शनिवारी रात्रीपर्यंत आलेल्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ८८ झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. अमरावतीमध्ये एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ४ हजार ४२२ इतकी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाने चार जणांचा बळी घेतला आहे. यामध्ये ४० वर्षीय महिलेसह, ३ इसमांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४८ वर्षीय महिला, २० वर्षीय तरुण, ७४ वर्षीय पुरुष आणि ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे मृतांचा आकडा १०७ इतका झाला आहे. आज आलेल्या दोन वेगवेगळया अहवालात सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागातून आढळून आले आहेत.