एटीएम ब्लाॅक झाल्याचा मोबाइलवर आला मॅसेज; युवकाने असे दिले उत्तर की, समोरच्याचे पितळ पडले उघडे

कोरोनामुळे (corona virus) यंदाही अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्याचाच फायदा घेण्यासाठी ऑनलाइन फसवणूक (online fraud) करणाऱ्या टोळी सक्रीय झाल्या असून सायबर सेलकडे तक्रारी दाखल झाल्याचे अनेक प्रकरण आपण पाहिले आहे. असाच भारतीय स्टेट बँकेच्या (Indian state bank of india) नावाने एक फेक मेसेज स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्या विद्यार्थ्याला आला.

    अमरावती (Amravati).  कोरोनामुळे (coronavirus) यंदाही अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्याचाच फायदा घेण्यासाठी ऑनलाइन फसवणूक (online fraud) करणाऱ्या टोळी सक्रीय झाल्या असून सायबर सेलकडे तक्रारी दाखल झाल्याचे अनेक प्रकरण आपण पाहिले आहे. असाच भारतीय स्टेट बँकेच्या (indian state bank of india) नावाने एक फेक मेसेज स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्या विद्यार्थ्याला आला. त्यानंतर या तरुणानं असं काही उत्तर दिलं, की ते सोशल मीडियावर चांगलंय धुमाकूळ घालत आहे.

    तरुणानं फेक मेसेजला दिलेलं उत्तर
    अमरावतीमधील अचलपूर येथील अफसर शेख हा स्पर्धा परीक्षेची तयार करणारा विद्यार्थी आहे. त्याला २४ मे रोजी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने एक मेसेज आला. त्यामध्ये तुम्ही एटीएम अपडेट केलेलं नाही. त्यामुळे तुमचं एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याचं सांगितलंय. तुम्हाला एटीएम अपडेट करायचं असेल तर आम्हाला या नंबरवर संपर्क करा, असे त्या मेसेजमध्ये लिहिण्यात आले. त्या मेसेजमधील व्याकरणाच्या चुका पाहून या विद्यार्थ्याला संशय आला. त्याने मेसेजला भन्नाट उत्तर दिले.

    या विद्यार्थ्याने त्याला असं लिहिलंय की, ‘भावा पहिली गोष्ट ही आहे की Have आणि Has सोबत क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात. म्हणून Blok ऐवजी Blocked आणि Updat ऐवजी Updated येतं. भावा जर व्याकरण नीट शिकला असता तर असे दोन नंबरचे धंदे करण्याची वेळ आली नसती आणि आणखी एक गोष्ट माझं अकाऊंट अॅक्सिस बँकेत आहे.’ त्यानंतर या मेसेजचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.