मुंबईनंतर आता अमरावतीतही आढळली स्फोटकं; पोलीसांनी दोन तरुणांना घेतले ताब्यात

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकामध्ये तब्बल २५ किलो जिलेटीन काड्या पोलीसांच्या हाती लागल्या आहेत. या स्फोटंकाची पोलीसांना गुप्त माहीती मिळाली होती. त्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी नाकाबंदी केली. यावेळी रात्रीच्या सुमारास २ युवक मोटारसायकलने जिलेटीन व स्फोटकं नेत असल्याचा संशय पोलीसांना आला. त्यानंतर पोलीसांनी पाठलाग करुन २०० नग जिलेटीन व २०० नग नॉक डिटोनेर जप्त केले आहेत.

    अमरावती : उद्योगपती मुकेश अंबांनी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडल्यानंतर आता अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकामध्ये तब्बल २५ किलो जिलेटीन काड्या पोलीसांच्या हाती लागल्या आहेत. या स्फोटंकाची पोलीसांना गुप्त माहीती मिळाली होती. त्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी नाकाबंदी केली. यावेळी रात्रीच्या सुमारास २ युवक मोटारसायकलने जिलेटीन व स्फोटकं नेत असल्याचा संशय पोलीसांना आला. त्यानंतर पोलीसांनी पाठलाग करुन २०० नग जिलेटीन व २०० नग नॉक डिटोनेर जप्त केले आहेत.

    दरम्यान मुंबईतील स्फोटकांचा प्रश्न चर्चेत असताना अमरावतीतही स्फोटकं आढळल्याने पोलीसासमोर मोठ आव्हान उभं राहीलं आहे. ही स्फोटकाचा कशासाठी वापर करण्याचा प्रयत्न होता. या प्रकरणात नेमका कोणाचा हात आहे. हे शोधण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

    पोलीसानी चौकशी केली असता या संपूर्ण प्रकरणामागे २ नाव समोर आली आहेत. तसेचं मोठी टोळी असल्याचा संशय असल्याने पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत.