प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

येथील वृंदावन कॉलनी शेजारी असलेल्या गुलाबराव महाराज नगरामध्ये सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारात एक महिला व लहान मुलगा रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे लक्षात आल्यावर याची माहीती तेथील रहिवाश्यांनी चांदूरबाजार पोलीसांना दिली. त्यानंतर ठाणेदार सुनिल किनगे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक ठाणेदार पंकज दाभाडे आपल्या सहकार्‍यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. मृतक माधुरी गजानन चिंगणगुढे (३५) आणि मुलगा ऋषी गजानन चिंगणगुढे (८) असून दोघेही वरुड ता.आर्णी जि.यवतमाळ येथील रहिवाशी असल्याचे कळते.

  • गुलाबबाबा नगर काॅलीनीतील हत्येचा थरार

चांदूरबाजार (Chandurbajar).  येथील वृंदावन कॉलनी शेजारी असलेल्या गुलाबराव महाराज नगरामध्ये सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारात एक महिला व लहान मुलगा रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे लक्षात आल्यावर याची माहीती तेथील रहिवाश्यांनी चांदूरबाजार पोलीसांना दिली. त्यानंतर ठाणेदार सुनिल किनगे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक ठाणेदार पंकज दाभाडे आपल्या सहकार्‍यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. मृतक माधुरी गजानन चिंगणगुढे (३५) आणि मुलगा ऋषी गजानन चिंगणगुढे (८) असून दोघेही वरुड ता.आर्णी जि.यवतमाळ येथील रहिवाशी असल्याचे कळते.

मृतक नेर येथे भावाकडे राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून मृतक महिलेले भावाकडे चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहीती आहे. सदर चिठ्ठी व माहेरच्यांना बोलावल्याची माहिती पोलीसांनी दिली असून हि नेमकी हत्या आहे कि आत्मघात?याबाबत पोलीस संभ्रमात असून चौकशी सुरु असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. घटनास्थळी ब्लेड चे पत्ते असल्याचेही छायाचित्रावरुन दिसून येते.