amravati city police website have old cp photo

अमरावती. आधुनिक काळातील गुन्हे उघडकीस आणण्यात सायबर पोलिस यंत्रणेची मोठी मदत मिळते. दरररोज नवीन प्रणालीचे कामकाज करताना अपडेट राहण्याची जबाबदारी सायबर पोलिसांची आहे. परंतु, अमरावती सिटी पोलिस (amravati city police) या वेबसाईटला (website) अपडेट ठेवण्याचा विसर सायबर यंत्रणेला पडल्याचे दिसून येत आहे. ९ सप्टेंबर रोजी शहर पोलिस आयुक्तालयात नवीन पोलिस आयुक्‍त आरती सिंह (arti singh) रूजू झाल्या. तीन दिवस उलटूनही १२ सप्टेंबर रोजी अमरावती सिटी पोलिसच्या वेबसाईटवर तत्कालीन सीपी संजयकुमार बाबीस्कर यांचे नाव व छायाचित्र सिटी पोलिसांच्या वेबसाईटवर अद्यापही झळकत आहे.

सीपी आरती सिंह घेणार का दखल?

अमरावती सिटी पोलिस ही वेबसाईट सर्च करताच प्रथम तत्कालीन सीपींचा फोटो, नाव व एक संदेश पहायला मिळत आहे . सीपी बदलताच वेबसाईटवरील नव्या सीपींची माहिती अपडेट होणे अपेक्षित होते. परंतु, याकडे सायबरचे अद्याप दुर्लक्ष आहे. सीपी आरती सिंह सायबर क्राईमविषयी अति संवेदनशीलपणे काम करतात. त्यांनी जामताडा येथील सायबर गुन्हेगाराच्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. अमरावतीत रूजू झाल्यानंतर त्यांनी सायबर क्राईमवर विशेष लक्ष ठेवणार असल्याचे सांगितले. त्यामुळे सायबर पोलिस ठाण्यातील कामकाज आपडेट ठेवण्याबद्दल सीपी आरती सिंह दखल घेणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे