amravati cp aarti singh

जनतेच्या सुरक्षेसाठी गुन्हेगरी आणि अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्याचे प्रयत्न राहतील. महिला सुरक्षेला प्राधान्य देऊन त्यांना आत्मनिर्भर करू. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून शहरात शांतता ठेवू. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा पोलिसांचे अवैध धंद्याशी आर्थिक व्यवहार खपवून घेतले जाणार नाही. पोलिसांप्रती जनभावना सुधारण्यासाठी आणि पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्त करू, असे नवनियुक्त 'पोलिस आयुक्‍त आरती सिंह यांनी बुधवारी रुजू होताच माध्यमांशी बोलताना सांगितले.

  • पोलिसांची प्रतिमा उंचावणयाचे प्रयत्न
  • झिरो टॉलरन्स करप्शन

अमरावती. (Amravati) नवनियुक्‍त पोलिस आयुक्‍त (cp) आरती सिंह (aarti singh) यांनी रुजू होताच झिरो टॉलरन्स करप्शनबाबत आपले मत स्पष्ट केले. भ्रष्टाचार व अवैध धंधेवाल्याशी संबंध ठेवणाऱ्या पोलिसांना सोडले जाणार नाही. एका पोलिसामुळे संपूर्ण विभागातील पोलिसांची बदनामी होते. पोलिसांची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मत आरती सिंह यांनी स्पष्ट केले. एकाच ठिकाणी अनेक दिवसांपासून कर्तव्य बजावणाऱ्यांना तत्काळ रिलिव्ह केले जाईल. ३० सप्टेंबरपूर्वी साधारण बदल्या करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. सीपी आरती सिंह २००६ बॅचमधील आयपीएस अधिकारी आहेत.

गडचिरोली, भंडारा आणि नागपूर ग्रामीण विभागात तब्बल ९ वर्षे कर्तव्य बजावले आहे. त्यांना विदर्भाचा चांगला अनुभव आहे. त्यांच्या उत्तम कार्यपद्धतीमुळे त्यांना पोलिस महासंचालक पदक, राज्य सरकारचे विशेष सुरक्षा पदक आणि केंद्र शासनाकडून आंतरिक सुरक्षा पदकाने सन्मानीत करण्यात आले आहे. नागरिकांच्या सहकार्याने अँक्टिव्ह पोलिसिंग, सर्व सामान्यांची सुरक्षा, महिला सुरक्षेला प्राधान्य देणार आहे. नवीन आव्हान असणाऱ्या कोरोनाशी लढा देण्यासाठी उपाययोजनांवर विशेष भर देणार असून, मास्क वापराबाबत सक्त भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एमडी गायनाकलॉजिस्ट असणाऱ्या आरती सिंह यांनी काही काळ वैद्यकीय क्षेत्रात कर्तव्य बजावले. त्यावेळी मुलगी होण्याच्या कारणावरून महिलांना किती त्रास सहन करावा लागतो. आपण महिलांसाठी काही करायला पाहिजे, अशी जाणीव त्यांना झाली. त्यानंतर युपीएससीची परीक्षा देऊन त्या आयपीएस अधिकारी बनल्या

सीपी आरती सिंह

नवीन सीपींचा अजेंडा
महिला सुरक्षेला प्राध्यान्य
झिरो टॉलरन्स करप्शन
गुन्हेगारांना सोडणार नाही
अवैध धंदे खपवून घेणार नाही
तणावमुक्त पोलिसिंग
सायवर क्राईमवर विशेष लक्ष
कोरोना सुरक्षेविषयी उपाययोजना
गुन्हेगारीवर अंकुश ठेवणार
पीसफुल अमरावती
राजकीय दबावात राहणार नाही
अमरावतीची ऐतिहासिकता कायम ठेवू
सुरक्षित वाहतुकीवर लक्ष देणार