अमरावती जिल्हा सहकारी बँक निवडणूक : परिवर्तन पॅनलचे राज्यमंत्री बच्चू कडू विजयी

    अमरावती (Amravati) : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक (Amravati District Co operative Bank Election) सोमवारी पार पडली. आज सकाळी या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. परिवर्तन पॅनलचे राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) विजयी झाले आहेत. (Amravati District Co-operative Bank Election: Parivartan Panel’s Bacchu Kadu wone)

    परिवर्तन पॅनलचे उमेदवार आणि राज्य मंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांचा पराभव केला आहे. चांदूर बाजार मतदारसंघाच्या निवडणुकीचा हा निकाल हाती आला आहे.

    मागील दहा वर्षापासून बबलू देशमुख यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सत्ता आहे. मध्यंतरी या बँकेवर जवळपास चार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप झाला होता. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरली.