मुसळधार पावसाने अमरावती जलमय; लाखो रुपयांच्या मोबाईलची नासाडी

या मार्केटमध्ये अनेक दुकान मोबाईल रिपेरिंगची होती त्यामुळे ग्राहकांचे  दुरुस्तीसाठी आणलेले मोबाईलसुद्धा खराब झाले.  ग्राहकांचे मोबाईल कसे परत करावे असा प्रश्न..

    अमरावती, (Amravati)जिल्ह्यासह शहरांमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसानेc(heavy rainfall) हजेरी लावली, त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं असून अमरावती शहरातील राजकमल चौकातील मुख्य मार्केटमध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. या मार्केटमध्ये २५ पेक्षा जास्त मोबाईलचे दुकान असून त्या दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने संपूर्ण मोबाईल हे खराब झाले.

    या मार्केटमध्ये अनेक दुकान मोबाईल रिपेरिंगची होती त्यामुळे ग्राहकांचे  दुरुस्तीसाठी आणलेले मोबाईलसुद्धा खराब झाले.  ग्राहकांचे मोबाईल कसे परत करावे असा प्रश्न व्यापाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.  महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे आमच्या दुकानात पाणी शिरले असा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.