पूलाच्या खोदकामात पडली मिनिडोअर; चालक गंभीर

अंजनगाव सुर्जी (अमरावती). अंजनगाव सुर्जी शहरातील मध्यवस्तीतून सातारा ,बैतुल  जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या   महामार्ग रस्त्याचे काँक्रिटिकरनाचे काम सुरु आहे. ऐन मुख्य रस्त्यावरील खोडगाव, देवगाव रोडवरील विठ्ठल मंदिरा समोरील पुलाच्या बांधकामासाठी गेल्या आठ महिन्यासापासून खोदकाम करून ठेवले असल्याने ते जीवघेणे ठरत आहे. काल रात्री अकरा वाजताचे दरम्यान एक मिनीडोअर या खोदकामात पडला. यात चालक शरद घोगरे गंभीर जखमी झाले आहे. उपस्थितांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.