जिल्ह्यात आणखी १५६ नवे रूग्ण आढळले

अमरावती (Amaravati).  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट, पीडीएमसी लॅब व ध्रुवा लॅबच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी १५६ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्चचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार आज अद्यापपर्यंत २२७ रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६ हजार ७३६ झाली आहे.

विशेष म्हणजे, मोर्शी वरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रकृती अस्वस्थतामुळें संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कोविड प्रयोग शाळेत थ्रोट स्वाब तपासणी केली असता ती कोरोणा पॉझिटिव्ह आली . आ. भुयार हे नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल झाले असल्याचे सांगण्यात आले.