६ ते ७ जणांना घरात कोंडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; समूहाला जातिवाचक शिविगाळ

ममदापूर येथे डोंगरे यांच घर आहे. यात अचानक गावातील 6 ते 7 जणांनी एकत्र येत डोंगरे यांच्या घरावर येत सुरवातीला डोंगरे यांच्या घरातील लोकांना जातीवाचक शिवीगाळ केली असा आरोप पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत करण्यात आला.

    तिवसा (Tivasa) : अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ममदापूर येथे आपसी वादातून एका दलित समाजाच्या घरावर 6 ते 7 जणांनी एकत्र येत घरात घुसून हल्ला केला यात घराला आग लावून घरातील माणसे पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या मारहाणीत 2 जण जखमी झाले असून ही घटना शनिवारी रात्री १० वाजता घडली या घटनेनंतर तिवसा पोलीस ठाण्यात आरोपीला अटक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती त्यामुळे पोलीस ठाण्यात तणाव निर्माण झाला होता.

    ममदापूर येथे डोंगरे यांच घर आहे. यात अचानक गावातील 6 ते 7 जणांनी एकत्र येत डोंगरे यांच्या घरावर येत सुरवातीला डोंगरे यांच्या घरातील लोकांना जातीवाचक शिवीगाळ केली असा आरोप पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत करण्यात आला. यात रात्री उशिरा 6 आरोपींना ताब्यात घेतले असून घटनेचे गांभीर्या लक्षात घेत उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव पोलीस ठाण्यात दाखल झाले.

    या प्रकरणी तिवसा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पोलीस ठाण्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे..यावेळी पोलीस ठाण्या समोर शेकडो जणांचा जमाव झाल्याने तणावपूर्ण वातावरण झाले होते.