जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचे बच्चू कडूंचे संकेत

कोरोनामुळे अद्याप शाळा सुरू झाल्या नाहीत. सध्या अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे, परंतू त्याची गरज नाही. शिक्षण हे सार्वत्रिक असलं पाहिजे, ते सर्वांना समान मिळालं पाहिजे. गरीब आणि श्रीमंत यातून विषमता निर्माण होऊ नये असं म्हणत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत या संदर्भात पाच ते सहा वेळा व्हीसी द्वारे बैठका झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

संपूर्ण देशासह राज्यात कोरोनाचा विषाणूचे संकट ओढावले आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आलेले आहेत. तसेच राज्यातील शाळा जानेवारी महिन्यापासून सुरू कराव्यात, त्याचबरोबर उन्हाळ्याची सुट्टी रद्द करावी, असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्याचे राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

बच्चू कडू म्हणाले की, कोरोनामुळे अद्याप शाळा सुरू झाल्या नाहीत. सध्या अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे, परंतू त्याची गरज नाही. शिक्षण हे सार्वत्रिक असलं पाहिजे, ते सर्वांना समान मिळालं पाहिजे. गरीब आणि श्रीमंत यातून विषमता निर्माण होऊ नये असं म्हणत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत या संदर्भात पाच ते सहा वेळा व्हीसी द्वारे बैठका झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

शैक्षणिक वर्षासाठीचं धोरण निश्चित झालं पाहिजे. तसेच सर्वांना १०० टक्के शिक्षण मिळावे यासाठी उन्हाळ्याची सुट्टी रद्द करुन जानेवारीपासून शाळा सुरु करण्यात याव्यात असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले.