शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडूं मोटर सायकल रॅलीने दिल्लीकडे रवाना, सर्वसामान्यांना केले हे आवाहन

देशात दर दिवसाला शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. केंद्र सरकारची भूमिका एखाद्या डाकू सारखी आहे. अशा भूमिकेमुळे शेतकरी लु़टला जात आहे. अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. बच्चू कडू आज मध्यप्रदेशहून ग्वाल्हेरच्या दिशेने रवाना झाले आहेत.

अमरावती : केंद्र सरकारने (Central Government) पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी गेल्या १५ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन (Farmers Movement) करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशातील शेतकऱ्यांनी आणि विविध शेतकरी संघटना, सर्व विरोधी पक्षांनी भारत बंदची घोषणा केली होती. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu)  हे मोटार सायकलने दिल्लीच्या दिशेला रवाना झाले (Motorcycle Rally Departs For Delhi ) आहेत. त्यांच्या आंदोलनाला आज पाचवा दिवस आहे. शेतकरी आंदोलनावर बच्चू कडूंनी प्रतिक्रिया देताना केंद्र सरकारवर टीका केली आहे.

देशात दर दिवसाला शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. केंद्र सरकारची भूमिका एखाद्या डाकू सारखी आहे. अशा भूमिकेमुळे शेतकरी लु़टला जात आहे. अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. बच्चू कडू आज मध्यप्रदेशहून ग्वाल्हेरच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत अनेक शेतकरीही आहेत. शेतकरी आंदोलनात सामील झालेल्या प्रत्येकाला बच्चू कडू यांनी सलाम आणि मानाचा मुजरा केला आहे.

शेतकऱ्यांना आंदोलनात यशस्वी करण्यासाठी शेतकरी आंदोलनात सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहनही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे. बच्चू कडू उत्तरप्रदेशच्या दिशेने रवाना झाले असून येत्या १० डिसेंबरला ते दिल्लीत दाखल होतील.