शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत दोन एकरातील गहू जळून खाक

रासेगाव येथील शेतकरी श्रीकांत अडगोकर यांच्या शेतातील 2 एकरातील गव्हाला आग लागून राखरांगोळी झाली. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत शॉर्टसर्किटने आग लागल्याचे सांगितले जात आहे.

    शिंदी बुजरुक (Shindi Bujruk).  नजीकच्या रासेगाव येथील शेतकरी श्रीकांत अडगोकर यांच्या शेतातील 2 एकरातील गव्हाला आग लागून राखरांगोळी झाली. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत शॉर्टसर्किटने आग लागल्याचे सांगितले जात आहे.

    अडगोकर यांच्या शेतात गेल्या काही दिवसांपासून शॉर्टसर्किट होत होते. या प्रकाराची तक्रार महावितरण कार्यालय रासेगाव येथे करण्यात आली होती. मात्र महावितरण कार्यालयाने या तक्रारीची दखल घेतली नाही. परिणामी रविवारी मध्यरात्री शॉर्टसर्किट होऊन पडलेल्या ठिणगीने दोन एकरातील गव्हाची राखरांगोळी केली.

    यामध्ये ६० हजारांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्या. महावितरणने झालेल्या नुकसानीची भरपाई करून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी अडगोकर यांनी केली आहे.