आरोग्य केंद्रातील प्रसूतीगृहात ठेवली सिमेंटची पोती

येथील खीरपाणी आरोग्य केंद्रातातील प्रसतीगृह कक्षात सिमेंटची पोते आढळून आल्याने, एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागावर प्रश्न चिन्ह निर्माण होत असून, मेळघाटातील आरोग्य विभागातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

    चिखलदरा (Chikhaldara).  येथील खीरपाणी आरोग्य केंद्रातातील प्रसतीगृह कक्षात सिमेंटची पोते आढळून आल्याने, एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागावर प्रश्न चिन्ह निर्माण होत असून, मेळघाटातील आरोग्य विभागातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

    काही दिवसांपूर्वीच मेळघाटातील काटकुंभ आरोग्यकेंद्रात मृत उंदीरा बरोबरच मुदतबाह्य औषधी आढळूल आले होते. या प्रकरणाची चौकशी सुरु असतांनाच आता टेंब्रूसोडा प्राथमिक आरोग्यकेंद्रातर्गंत येणार्या खिरपाणी या उपकेंद्राचा भोंगळ कारभार पुढे आला आहे. येथील प्रसुतीगृहातील आवश्यक वस्तु अस्तव्यस्थ असल्याचे आढळून आले. तर या गृहाचा उपयोग चक्क सिमेंटची पोते ठेवण्यासाठी केल्याचे दिसून आले. त्यामुळे याठीकाणी जर एखादी महिला प्रसुतीसाठी आली तर तिची प्रसूती कोठे केल्या जाते असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

    याठिकाणचे सामुदायिक आरोग्य अधिकारीही काही दिवसांपासून गैरहजर असल्याची माहिती आहे. त्यामुळे या भोंगळकारभारामुळे गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाकडे मेळघाटातील आरोग्य यंत्रणेने लक्ष देणे अधिक गरजेचे आहे.