चिखदऱ्यातील ‘स्कायवॉक प्रकल्प’ उभारणीत केंद्र सरकारचे विघ्न; ‘वाईल्ड लाईफ’वर परिणाम होणार का? आधी तपासा….

जिल्ह्यातील चिखलदऱ्यात (Chikhaladara) होणाऱ्या जगातील (the world) तिसऱ्या आणि भारतातील (India) पहिल्या काचेच्या स्काय वॉकला (India's first glass sky walk in Chikhaladara) केंद्र सरकारने (The central government) रेड सिग्नल दाखवला आहे. ज्या परिसरात स्कायवॉक बनतोय तो व्याघ्र अधिवसाचा भाग आहे.

  अमरावती (Amravati). जिल्ह्यातील चिखलदऱ्यात (Chikhaladara) होणाऱ्या जगातील (the world) तिसऱ्या आणि भारतातील (India) पहिल्या काचेच्या स्काय वॉकला (India’s first glass sky walk in Chikhaladara) केंद्र सरकारने (The central government) रेड सिग्नल दाखवला आहे. ज्या परिसरात स्कायवॉक बनतोय तो व्याघ्र अधिवसाचा भाग आहे. त्या परिसरात घनदाट जंगल (densely forested) असून वन्य प्राण्यांचा अधिवास (wildlife habitat) आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उच्च दर्जाचे संवर्धन आणि संरक्षणाची (high level of conservation and protection) आवश्यकता आहे. (central government gives a Red signal World Longest Glass Skywalk in Amravati)

  नॅशनल आणि स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफला प्रस्ताव सादर करण्याचं केंद्र सरकारच्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्या प्रोजेक्ट्चा इकोलॉजिकल स्टडी करा आणि त्याचा त्यावर काही परिणाम होतो का, त्या प्रोजेक्टचा वाईल्ड लाईफवर काही परिणाम होतो का? हे ही तपासा असंही केंद्र सरकारच्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. आता यावर सिडको लवकरच तज्ज्ञांची निवड करून त्यांच्याकडून अहवाल घेऊन परत प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

  चिखलदरा पर्यटन विकासाच्या आराखड्यात या स्कायवॉकचा समावेश करण्यात आला आहे. अमरावतीमध्ये चिखलदरा येथे स्कायवॉकची सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहे. या स्कायवॉकची लांबी 500 मीटर इतकी असणार आहे. आतापर्यंत त्याचे बरेचसे काम पूर्ण झाले आहे. या स्कायवॉकसाठीचे एकूण बजेट 34 कोटी रुपये आहे. या स्कायवॉकचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी लागणार आहे.

  चिखलदऱ्यात होणारा हा पूल भारतातील पहिला काचेचा स्कायवॉक असणार आहे. चिखलदरातील गोराघाट पॉईंटपासून ते हरीकेन पॉंईंटपर्यंत हा स्कायवॉक असेल. सध्या या प्रकल्पाचे काम जलदगतीने सुरु (Longest Glass Bridge in Amravati) आहे. हा स्कायवॉक भारतातील पहिला आणि जगातील तिसरा हा गगनभरारी पूल असणार आहे. या स्कायवॉकने दोन मोठ्या टेकड्यांना जोडलं जाणार आहे. हा स्कायवॉक पूर्णपणे काचेचा असणार आहे. यामुळे चिखलदऱ्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांकरिता एक नवं आकर्षण निर्माण होणार आहे.

  स्कायवॉकचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या भागात पर्यटकांची संख्या वाढेल. मेळघाटातील चिखलदरा हा भाग सिडकोद्वारे विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे आता अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये देशातून पर्यटकांची गर्दी वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

  जगात सध्या स्वित्झर्लंड आणि चीन या ठिकाणी असा काचेचा स्कायवॉक आहे. स्वित्झर्लंडचा स्कायवॉक हा 397 मीटरचा आहे. तर चीनमधील स्कायवॉक 360 मीटरचा आहे. त्यामुळे चिखलदरा येथे होत असलेला स्कायवॉक हा जगातील तिसरा सर्वात मोठा स्कायवॉक असणार आहे. चिखलदरा येथे होणारा हा स्कायवॉक 500 मीटर असेल. त्यासाठी 34 कोटी रुपये लागणार आहेत.