…ऑटो लवकरच पंक्चर करू; चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाविकास आघाडीला इशारा

'युवा वॉरियर्स' अभियानांतर्गत बावनकुळे हे अमरावतीत गुरूवारी आले असता,  ते पत्रकार परिषदेत बोलत होते. १८ ते २५ वयोगटातील युवक, युवतींना देशाच्या जडणघडणीत सहभागी करून घेण्यासाठी हा उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या गलथान कारभारामुळे त्रस्त आहे. येत्या जिल्हा परिषद, महापालिका, नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजप जनतेपर्यंत पाेहोचून महाविकास आघाडीने भकास कसे केले, याची माहिती देणार असल्याचे ते म्हणाले.

    अमरावती : राज्याचे माजी ऊर्जामंत्री तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीला सत्तेचा माज आला असून, ही तीनचाकी ऑटो लवकरच पंक्चर केली जाईल, अशा प्रकारचा थेट इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.

    ‘युवा वॉरियर्स’ अभियानांतर्गत बावनकुळे हे अमरावतीत गुरूवारी आले असता,  ते पत्रकार परिषदेत बोलत होते. १८ ते २५ वयोगटातील युवक, युवतींना देशाच्या जडणघडणीत सहभागी करून घेण्यासाठी हा उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या गलथान कारभारामुळे त्रस्त आहे. येत्या जिल्हा परिषद, महापालिका, नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजप जनतेपर्यंत पाेहोचून महाविकास आघाडीने भकास कसे केले, याची माहिती देणार असल्याचे ते म्हणाले.

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बेकायदेशीरपणे अटक केली, हे न्याय दंडाधिकाऱ्यांनी जामीन देऊन सिद्ध केले आहे. शिवसेनेला सत्तेचा माज आला आहे. येत्या निवडणुकांमध्ये सेनेला जागा ठेवणार नाही, असे भाजपचे नियोजन आहे. असं बावनकुळे म्हणाले.