अभियांत्रिकीच्या पूर्ण, पुरवणी परीक्षा सुरू; अन्य अभ्यासक्रमाच्या परीक्षा अंतिम आठवड्यात

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षा पूर्ण झाला आहे. सद्यस्थितीत पुरवणी परीक्षा सुरू असून अन्य अभ्यासक्रमाच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या अंतिम आठवड्यात घेतल्या जाणार आहे.

  अमरावती (Amravati).  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षा पूर्ण झाला आहे. सद्यस्थितीत पुरवणी परीक्षा सुरू असून अन्य अभ्यासक्रमाच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या अंतिम आठवड्यात घेतल्या जाणार आहे. अभियांत्रिकी शाखेत ३० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर अन्य अभ्यासक्रमांच्या परीक्षेला तब्बल 2 लाख विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहे.

  परीक्षा ऑनलाइन-ऑफलाइन
  अन्य अभ्यासक्रमांच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेतल्या जाणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने नियोजन केले आहे. अन्य अभ्यासक्रमांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान तसेच मानव्यविद्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन परीक्षा देता येणार आहे. परीक्षा संचालित करण्यास अडचण होऊ नये म्हणून प्रश्नपत्रिका एक दिवस अगोदरच परीक्षा केंद्रांवर पोहचणार आहे. त्यामुळे परीक्षा सुरू होताना गोंधळ उडणार नाही, याची दक्षता विद्यापीठाकडून घेतली जात आहे.

  परीक्षेचे नियोजन पूर्ण
  अभियांत्रिकीच्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. पुरवणी परीक्षा सुरू असून अन्य अभ्यासक्रमांच्या परीक्षा एप्रिलच्या अंतिम आठवड्यात घेतल्या जाणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन परीक्षा देता येणार आहे. या परीक्षेत 2 लाख विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहे.
  — हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग