डायग्नोस्टिक सेंटरवर कोरोना प्रतिबंधक नियमांची पालमल्ली; कारवाई करण्याची भाजपाची मागणी

शहरातील डायग्नोस्टिक सेंटरमधील सिटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी व एक्सरे सेंटरवर कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली होत असल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे याबाबतची सखोल चौकशी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सेंटरवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.

    अमरावती (Amravati).  शहरातील डायग्नोस्टिक सेंटरमधील सिटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी व एक्सरे सेंटरवर कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली होत असल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे याबाबतची सखोल चौकशी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सेंटरवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे. यासंदर्भातील निवेदन महापालिकेचे माजी सभापती गोपाल गुप्ता यांनी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांना सोपविले.

    एका रुग्णांचे कपडे दुसऱ्या रुग्णांना
    कोरोना संसर्गाच्या तपासणीसाठी सिटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी, एक्सरे, रक्त तपासणी करण्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. तो रुग्ण डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गेल्यानंतर त्याला आधीच्या रुग्णानेच घातलेले कपडे घालायला लावले जातात. या सेंटरवर पिण्याच्या पाण्यासाठी एकच ग्लास आहे.

    प्रत्येक रुग्णाला एकच कपडे घालणे आणि एकाच ग्लासचा वापर करणे, हा प्रकार कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. तसेच सॅनिटाइझ करण्याकडेही हे सेंटर दुर्लक्ष करीत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. शहरातील बहुतांश सेंटरवर अशाप्रकारे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढलेला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.