yashomati thakur latest

कर्तव्यावरील वाहतुक पोलिस कर्मचार्याला मारहाण केल्याच्या आरोपात न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकुर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. तिन महिन्याच्या शिक्षेचा निर्णय दिल्यानंतर यशोमती ठाकुर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

अमरावती. कर्तव्यावरील वाहतुक पोलिस कर्मचार्याला मारहाण केल्याच्या आरोपात न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकुर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. तिन महिन्याच्या शिक्षेचा निर्णय दिल्यानंतर यशोमती ठाकुर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने मंत्री यशोमती ठाकुर यांच्या शिक्षेला स्थगिती दिली असून, पोलिसांना नोटीस बजावली आहे.

असे आहे प्रकरण?
२४ मार्च २०१२ रोजी यशोमती ठाकुर राजापेठ हद्दीतील चुना भट्टी ते गांधी चौकाकडील एकेरी मार्गावरून वाहनाने जात होत्या. दरम्यान एकेरी मार्गावरून जाण्यास वाहतुक पोलिस कर्मचारी उल्हास रौराळे याने यशोमती ठाकुर यांना मनाई केली. त्यावेळी यशोमती ठाकुर यांनी मारहाण केल्याचा आरोप पोलिस कर्मचारी रौराळेने राजापेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीतून केला.

त्यानुसार राजापेठ पोलिसांनी यशोमती ठाकुर यांच्यासह त्यांच्या काही सहकार्यांविरुध्द गुन्हा नोंदविला. याप्रकरणात अमरावती जिल्हा न्यायालयाने नुकताच निर्णय देत यशोमती ठाकुर यांच्यासह त्यांचे सहकारी सागर खांडेकर, शरद जवंजाळ व राजु इंगळे यांना तीन महिन्यांचा सश्रम कारावास, प्रत्येकी १५ हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास १ महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.