amravati

अमरावती. कोरोनाबाधित झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेकडून झालेल्या त्रासाची गाथा सांगण्यासाठी चक्क एक पॉझिटिव्ह डॉक्टर सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. परंतु पत्रकारांव्यतिरिक्‍त कुणी नवीन व्यक्‍ती असल्याचे पाहून पोलिसांनी डॉक्टरला बाहेर बोलाविले. त्याने आरोग्य व्यवस्थेकडून झालेली हेळसांड आरोग्यमंत्र्यांना सांगणार असल्याचे पोलिसांना सांगितले. ‘पोलिसांनी त्याची समजून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु, ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर रुग्णवाहिका बोलावून पॉझिटिव्ह डॉक्टरला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तो बसायळाच तयार नव्हता. वृत्त लिहिस्तोबर गाडगेनगर पोलिस त्या डॉक्टरला समजाविण्याचा प्रयत्न करीत होते.

सभागृहाचे केले निर्जतुकीकरण

एक पॉझिटिव्ह रुग्ण सभागृहात येऊन बसल्याचे पाहून तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भंबेरीच उडाली . कर्मचाऱ्यांनी तत्काळ पॉझिटिव्ह बसलेल्या खुर्चीला सॅनिटाईज करून निर्जतुकीकरण केले. याशिवाय संपूर्ण सभागृहात फवारणी केली .