corona

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात पसरत आहेत. युके, ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांमध्ये सुद्धा कोरोनाचा प्रसार वाढत आहे. परंतु आता दक्षिण अफ्रिका आणि ब्राझिलमध्ये आढळून आलेल्या नव्या विषाणूचीही भारतात एन्ट्री झाली आहे. अमरावती आणि यवतमाळमध्ये कोरोनाचा यूकेमधील विषाणू सापडल्याने खळबळ उडाली आहे.

    अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात पसरत आहेत. युके, ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांमध्ये सुद्धा कोरोनाचा प्रसार वाढत आहे. परंतु आता दक्षिण अफ्रिका आणि ब्राझिलमध्ये आढळून आलेल्या नव्या विषाणूचीही भारतात एन्ट्री झाली आहे. अमरावती आणि यवतमाळमध्ये कोरोनाचा यूकेमधील विषाणू सापडल्याने खळबळ उडाली आहे.

    हा झपाट्यानं पसरणारा कोरोनाचा विषाणू असल्यानं यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. विदर्भात कोरोनाचा धोका खूपच वाढला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भिती व्यक्त केली जात आहे. यवतमाळ, अकोला आणि अमरावती शहरामध्ये पुन्हा लॉकडाऊन सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

    अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर जिल्ह्यात कोरोनाची पुर्ववत परिस्थिती निर्माण होऊन पुन्हा लॉकडाऊन करण्याशिवाय प्रशासनाला पर्याय राहणार नाही असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

    वर्धा जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. लग्न व इतर कार्यक्रमासाठी ५० व्यक्तींना परवनगी देण्यात आली आहे. औषधी दुकाने आणि रुग्णालये सोडून इतर दुकाने आणि बाजारपेठा सायंकाळी सात पर्यंत सुरू राहणार आहेत. तर, यवतमाळमध्येही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.