लसीकरणासाठी नागरिकांची उपजिल्हा रुग्णालयात गर्दी; सोशल डिस्टसिंगचा फज्जा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परीस्थितीमध्ये पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. सध्या देशभरात कारोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु आहे. त्यामुळे लस घेण्यासाठीही नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी झाल्याने सोशल डिस्टंन्सचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र पहायला मिळाले.

    दर्यापूर (Daryapur).  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परीस्थितीमध्ये पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. सध्या देशभरात कारोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु आहे. त्यामुळे लस घेण्यासाठीही नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी झाल्याने सोशल डिस्टंन्सचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र पहायला मिळाले.

    कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण देशभरात राबविण्यात येत आहे. परंतू जिल्ह्यात लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लसीकरणासाठीही नागरिकांची गर्दी होत आहे. दर्यापूर तालुक्यासाठी आरोग्य उपकेंद्रच्या वतीने पाच हजार कोरोना लसची मागणी करण्यात आली होती. मात्र 600 लसच रुग्णालयाला प्राप्त झाले आहे. ज्या नागरिकांनी लस घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्या नागरिकांना अद्यापही लस प्राप्त झालेली नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने विरोधात नागरिक नाराजी व्यक्त करीत आहे.

    दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयासाठी फक्त दोनशे लस प्राप्त झाली असून, ग्रामीण भागात येवदा आरोग्य उपकेंद्राला 150, तर चंद्रपूर उपकेंद्राला 150, व रामतीर्थ उपकेंद्राला 100 लस सद्यस्थितीमध्ये प्राप्त झालेली आहे. मात्र शासनाने लवकरात लवकर लस आरोग्य यंत्रणा कडे प्राप्त करावी जेणेकरून नागरिक हे लस घेऊ शकेल अशी मागणी नागरिकांनी शासनाकडे केली आहे.