सचिन वाझेंच्या जीवाला धोका; वाझेंचा मनसुख हिरेन होण्यास वेळ लागणार नाही !

'एनआयएने सचिन वाझे यांना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवले नाहीतर सचिन वाझेंचा मनसुख हिरेन होण्यास जास्त वेळ लागणार नाही. त्यांच्या जीवाला धोका असून एनआयएने त्यांना संरक्षण दयावे.

  अमरावती (Amravati).  ‘एनआयएने सचिन वाझे यांना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवले नाहीतर सचिन वाझेंचा मनसुख हिरेन होण्यास जास्त वेळ लागणार नाही. त्यांच्या जीवाला धोका असून एनआयएने त्यांना संरक्षण दयावे. येत्या काही दिवसांत मातोश्रीपर्यंत जातात अशा महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांचे नाव या प्रकरणामध्ये समोर येणार आहे. बड्या नेत्यांचा यामध्ये समावेश असेल. तसेच येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होण्याची भीती ठाकरे सरकारला आहे, असे धक्कादायक विधान खासदार नवनीत राणा यांनी केले.

  ‘मनसुखे हिरेन यांच्या प्रकरणात सचिन वाझे हे तपास करत होते. त्यांना एनआयएकडून चौकशीसाठी बोलाविण्यात आले. त्यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती मिळाली. त्यांची चौकशी झाली म्हणून मुंबई पोलिस आयुक्तांची बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिस आयुक्‍त पदावरून हटविण्यात आले. याप्रकरणामागील सत्य सचिन वाझे सांगतील, अशी भीती ठाकरे सरकारला आहे. त्यामुळे राज्यात खूप मोठा राजकीय भूकंप देखील होऊ शकतो’, असेही राणा म्हणाल्या.

  महाराष्ट्र सरकार यामध्ये सहभागी नाहीतर मुंबई पोलिस आयुक्तांची बदली का करण्यात आली? सहभागी असेल म्हणूनच पोलिस आयुक्तांची बदली करण्यात आली, असा सवालही नवनीत राणा यांनी उपस्थित केला.

  सचिन वाझैंचा एनआयए तपास करत असून एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझेंच्या घराची झडती घेतली आहे. या झडतीत अधिकाऱ्यांनी दोन सदरे जप्त केले आहेत. गुन्ह्या दरम्यान त्यांनी या दोन्ही सदराचा वापर केला होता. एनआयएला तपासात मिळालेल्या माहितीनुसार, गुन्ह्यात पीपीई किट नव्हता, तर तो पांढरा कता होता.

  CCTV मध्ये तो PPE किट वाटत होता. मात्र आरोपीनं संपूर्ण अंग झाकण्यासाठी पांढऱ्या रंगाचा सदरा घातला होता. त्यानंतर एनआयएनं त्या अँगलनं तपास सुरू केला होता. गुन्ह्यात वापरले दोन सदरे NIA च्या अधिका-यांनी जप्त केले आहेत. सचिन वाझे यांनी त्यातला एक सदरा मुलूंड टोलनाक्याजवळ केरोसीनने जाळला होता. तसंच काल रात्री वाझेंच्या घराच्या झडतीत एक कार जप्त केली आहे. कारमध्ये काही महत्वाचे पुरावे सापडले आहेत. दरम्यान, अन्य इतर तीन कारचा शोध NIA कडून सुरू आहे.

  वारझेसोबत जो दुसरा व्यक्‍ती कटात होता त्याचाही शोध लागला असून तो सध्या NIA च्या ताब्यात आहे. ती व्यक्‍ती पोलिस दलातील असल्याची माहिती NIA सुत्रांनी दिली आहे. तसंच हा संपूर्ण कट पब्लिसीटीसाठी केला असल्याची दाट शक्‍यता NIA ला आहे.

  कोण आहेत सचिन वाझे?
  1990 मध्ये सेवेत दाखल झालेल्या वाझे यांनी 63 गुंडांना यमसदनी धाडले होते. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात उपनिरीक्षक पदापासून झाली. गडचिरोली सारख्या नक्षत्रग्रस्त परिसरातून सेवेची सुरूवात करणा-या वाझे ठाणे पोलिस दलात आपल्या कामामुळे प्रसिद्धीला आले. 2002 घाटकोपर स्फोटातील संशयित आरोपी ख्वाजा युनुस कोठडीतील संशयीत मृत्यूप्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी शिवसेना पक्षातही प्रवेश केला होता. ख्वाजा युनुस प्रकरणी वाझे यांच्यासह इतर पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पुढे न्यायालयीन प्रक्रियाही चालली. वाझे यांच्यासर इतर विभागाच्या प्रभारीपदी त्यांची नियुक्‍ती करण्यात आली होती.