प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

अमरावती (Amravati) जिल्ह्यातील वरुड शेंदुर्जना घाट (Warud Shendurjana Ghat) येथून जवळच असलेल्या पुसली धरणाच्या (the Pusali Dam) काठावर शेकडो मासे हे मृतावस्थेत आढळून आल्याने (Hundreds of fish have been found dead) एकच खळबळ उडाली आहे. पाणी प्रकल्पातील शेकडो मासे मृतावस्थेत किनार्‍यावर आले आहे त्यामुळे हे मासे नेमके कशामुळे दगावले याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

    अमरावती (Amravati). जिल्ह्यातील वरुड शेंदुर्जना घाट (Warud Shendurjana Ghat) येथून जवळच असलेल्या पुसली धरणाच्या (the Pusali Dam) काठावर शेकडो मासे हे मृतावस्थेत आढळून आल्याने (Hundreds of fish have been found dead) एकच खळबळ उडाली आहे. पाणी प्रकल्पातील शेकडो मासे मृतावस्थेत किनार्‍यावर आले आहे त्यामुळे हे मासे नेमके कशामुळे दगावले याचे कारण अद्याप कळू शकले नाही. प्रकल्पाच्या पाण्याचे नमुने (The water samples of the project) अमरावतीच्या प्रयोगशाळेत तपासणी करता पाठविण्यात आले आहेत.

    अहवाल येईपर्यंत पाण्याचा पिण्यासाठी होणारा वापर बंद करण्यात आला आहे. वरुड तालुक्यातील पुसली धरण किनाऱ्यावर अचानक शेकडो मासे मरून पडलेल्यांची परिसरात खळबळ उडाली आहे. मृत मासे प्रकल्पाच्या काठावर येत आहे ही माहिती मिळताच शेंदुर्जनाघाट नगर परिषदेचे काही नगरसेवक व पाणीपुरवठा अभियंत्यांनी लगेच या पाणी प्रकल्पाची पाहणी केली व शेंदुर्जना घाट ला होत असलेला पाणीपुरवठा थांबवला आहे. फिल्टर प्लांट साफ करण्याचे निर्देश देखील देण्यात आले.

    शेंदुर्जना घाट नगरपरिषदेला पुसली प्रकल्पातून पाणीपुरवठा होत असल्याने सध्या पाणीपुरवठा बंद केला असून चौकशी सुरू आहे. तेव्हा मासे कशामुळे मरण पावले याचे नेमके कारण काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धरणावरुन पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याने लोकांची तारांबळ उडाली आहे.

    धरणातील पाण्याच्या अहवालाची प्रतीक्षा
    पुसला धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तेथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी अमरावतीच्या प्रयोशाळेत पाठविण्यात आले आहे मात्र अद्याप पर्यंत अहवाल अप्राप्त असल्याची माहिती पाणी शेंदूरजनाघाट नगर परिषेदेच्या पुरवठा अभियंता रश्मी बारस्कर यांनी दिली आहे.