वीज बिलावरून शरद पवार हे अदानी यांना भेटल होते. त्यानंतर त्यांनी या मुद्यावरून यू-टर्न घेतला, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. या गोष्टीत नखा एवढेही तथ्य नसून चर्चेत राहण्यासाठी काही लोक मोठ्या लोकांची नावे घेतात, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर केलीय.
अमरावती : वीज बीलाच्या मुद्द्यावरुन मनसेने आक्रमक घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरुनच मनसे प्रमुख राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
वीज बिलावरून शरद पवार हे अदानी यांना भेटल होते. त्यानंतर त्यांनी या मुद्यावरून यू-टर्न घेतला, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. या गोष्टीत नखा एवढेही तथ्य नसून चर्चेत राहण्यासाठी काही लोक मोठ्या लोकांची नावे घेतात, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर केलीय.
काय म्हणाले होते राज ठाकरे
पहिल्यांदा वीज मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही वीज दरात कपात करु. नंतर एकदम घुमजाव झालं. मी राज्यपालांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी शरद पवारांशी बोलून घेण्यास सांगितलं. मी त्यांच्याशी बोललो.” राज ठाकरे म्हणाले होते.
शरद पवार म्हणाले त्या वीज कंपन्यांच्या नावाने पत्र लिहून मला ते पत्र पाठवा. मग त्या कंपन्यांमध्ये अदानी, एमएसईबी असेल किंवा टाटा असेल त्यांच्याशी शरद पवार बोलणार होते. मात्र, ५-६ दिवसांनी असं कळलं की अदानी शरद पवार यांच्या घरी येऊन गेलेत. त्यात चर्चा काय झाली माहिती नाही. त्यानंतर सरकारने वीजबिल माफ करणार नाही असं उत्तर आलं. त्यामुळे पत्रकारांनी मुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्र्यांना याबाबत प्रश्न विचारणं गरजेचं असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते.