डीएफओ विनोद शिवकुमारला फाशीची शिक्षा द्या; मराठा महासंघाची मागणी

एका सर्वसामान्य कुटुंबातून अधिकारी झालेल्या दीपाली चव्हाण हरीसाल येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून आपले कर्तव्य पार पाडत होती. परंतु वरीष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्या मानसिक, शाररीक व आर्थीक त्रासाला कंटाळून दिपाली चव्हाणने आत्महत्या केली. दिपाली चव्हाण यांनी विनोद शिवकुमार त्रास देत असल्याची तक्रार माजी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक एम.एस. रेड्डी यांच्याकडे केली होती. परंतु तरीही या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही.

    मोर्शी. हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील दोषी डीएफओ अधिकारी विनोद शिवकुमार यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच माजी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक एम.एस. रेड्डी यांनाही सहआरोपी करण्यात यावे. अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

    एका सर्वसामान्य कुटुंबातून अधिकारी झालेल्या दीपाली चव्हाण हरीसाल येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून आपले कर्तव्य पार पाडत होती. परंतु वरीष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्या मानसिक, शाररीक व आर्थीक त्रासाला कंटाळून दिपाली चव्हाणने आत्महत्या केली. दिपाली चव्हाण यांनी विनोद शिवकुमार त्रास देत असल्याची तक्रार माजी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक एम.एस. रेड्डी यांच्याकडे केली होती. परंतु तरीही या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. असे दिपाली चव्हाणने आत्महत्या पूर्वी लीहलेल्या चिठ्ठीत नमुद केले आहे. दिपाली चव्हाणच्या आत्महत्तेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. त्यामुळे दोषी विनोद शिवकुमार याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच एम.एस. रेड्डी यांनाही या प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा समन्वयक अतुल सुभाषराव शेळके, प्रवीण चिखले, हिरा भोसले, विक्की लुंगे, रसिक ठाकरे, यांनी उपविभागीय अधिकारी मोर्शी यांना निवेदनाद्वारे केली.