डॉ. दिलीप मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरु पदी नियुक्ती

डॉ मालखेडे सध्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद येथे सल्लागार -१ या पदावर प्रतिनियुक्तीवर काम करीत आहेत. माजी कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ १ जून २०२१ रोजी संपल्यामुळे हे कुलगुरूपद रिक्त होते

    अमरावती (Amravati) : पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (the College of Engineering) येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक असलेल्या डॉ दिलीप नामदेवराव मालखेडे (Dr. Dilip Namdevrao Malkhede) यांची संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या (Sant Gadge Baba Amravati University) कुलगुरूपदी (the Vice Chancellor) नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ मालखेंडे यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी ही नियुक्ती केली आहे.

    डॉ मालखेडे सध्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद येथे सल्लागार -१ या पदावर प्रतिनियुक्तीवर काम करीत आहेत. माजी कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ १ जून २०२१ रोजी संपल्यामुळे हे कुलगुरूपद रिक्त होते. डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास भाले यांच्याकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

    डॉ मालखेडे सध्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद येथे सल्लागार -१ या पदावर प्रतिनियुक्तीवर काम करीत आहेत. माजी कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ १ जून २०२१ रोजी संपल्यामुळे हे कुलगुरूपद रिक्त होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास भाले यांच्याकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.