कोरोनाच्या संकटकाळात डॉ. अशोक भैय्या रुग्णासाठी देवदूत; गावागावात ऑक्सीमीटर तसेच नि:शुल्क आरोग्य सल्ला

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अतिवेगाने वाढणारा प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यात मृत्यूचे तांडव सुरु आहे; परंतु अशा या परिस्थितीमध्ये या महामारीला घाबरून न जाता गावागावात ऑक्सी मिटर चे वितरण व नि:शुल्क आरोग्य सल्ला देत गरीब रुग्णांसाठी धामणगावचे डॉ. अशोक भैय्या हे देवदूत ठरत आहेत.

    धामणगाव रेल्वे (Dhamangaon Railway).  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अतिवेगाने वाढणारा प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यात मृत्यूचे तांडव सुरु आहे; परंतु अशा या परिस्थितीमध्ये या महामारीला घाबरून न जाता गावागावात ऑक्सी मिटर चे वितरण व नि:शुल्क आरोग्य सल्ला देत गरीब रुग्णांसाठी धामणगावचे डॉ. अशोक भैय्या हे देवदूत ठरत आहेत.

    धामणगाव तालुक्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक गावे कोरोनाची हॉस्पॉट बनले आहे.त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. अशात इंजेक्शन, ऑक्सीजनचा तुटवडा, बेडचा तुटवडा जाणवत असल्याने, उपचार कोठे आणि कसा घ्याव्या या चिंतेने अनेक रुग्णांचे घरीच उपचारा विना मृत्यू होण्याचेही प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे; परंतु धामणगाव रेल्वे येथील शहीद भगतसिंग चौक येथील गेल्या 42 वर्षापासून गरीबांच्या सेवेत असलेला डॉ. भैय्या यांचा दवाखाना कोरोनाग्रस्तासाठी संजीवनी देणारे सल्ला केंद्र बनले आहे.

    कोरोना काळात आपल्या चिमुकल्याची कशी काळजी घ्यावी याविषयी ते पालकाना मागील एका वर्षा पासून मोफत मार्गदर्शन करीत आहे. आजच्या वैद्यकिय क्षेत्र हे व्यवसाय झालेला दिसत असला तरी डॉ .भैया हे या पासुन अलिप्त आहेत. एखाद्या गरीब रुग्णाजवळ उपचारासाठी शुल्क नसेल तर ते निशुल्क त्या रुग्णांवर उपचार करून, औषधोपचार करतात.