शेतकऱ्याने अमरावती तहसीलच्या दारात ओतले सोयाबीन; शेतकऱ्यांनी केला संताप व्यक्त!

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे तहसीलदाराच्या दारात सोयाबीन ओतुन आयात धोरणाविरुद्ध सोयाबीन उत्पादक शेतकरी यांनी संताप व्यक्त केला. सोयाबीनला दोन महिन्यापूर्वी ११,१११/- रूपायाचा भाव होता.

    अमरावती (Amravati) : केंद्र सरकारने (Central government) सोयाबीन (soybean meal) हंगामाच्या तोंडावर सोयाबीन पेंड आयात केली. आयातीचे धोरण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारे आहे. या निर्णयाच्या विरोधात अखिल भारतीय किसान सभाचे वतीने अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे तहसीलदाराच्या दारात सोयाबीन ओतून आयात धोरणाविरुद्ध सोयाबीन उत्पादक शेतकरी यांनी संताप व्यक्त केला. सोयाबीनला दोन महिन्यापूर्वी ११,१११/- रूपायाचा भाव होता.

    सोयाबीनला १०,००० रुपये भाव मिळावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली यावेळी पावसाने नुकसान झालेल्या सोयाबीनचे नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई देण्याची मागणी करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी तहसील मध्ये सोयाबीन फेकून संताप व्यक्त करण्यात आला.