बापाचे मुलीशी अश्लिल कृत्य; नात्याला फसला काळिमा

झोपलेल्या मुलीशी वडिलांनी अश्लील चाळे केले. हा प्रकार लक्षात येताच...

  • आरोपी निलंबित पोलीस कर्मचारी

अमरावती. बापाने आपल्या मुलीशी अश्लिल कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री उशिरा राजापेठ हद्दीत उघडकीस आला. आरोपी वडील निलंबित पोलीस कर्मचारी असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

पिडीत १२ वर्षिय मुलीचे आई-वडील विभक्त राहतात. मुलगी आईकडे राहत असताना अधून मधून वडिलांकडे राहायला जात होती. एके दिवशी मुलगी वडीलाकडे राहायला गेली असता झोपलेल्या मुलीशी वडिलांनी अश्लील चाळे केले. हा प्रकार लक्षात येताच पीडित मुलगी आजीकडे झोपायला गेली. त्यानंतर तीने सर्व हकीकत आईला सांगितले. त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला.