श्रीनिवास रेड्डीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; बेलदार समाजाचा आंदोलनाचा इशारा

हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. यामध्ये वरीष्ठ अधिकारी डीएफओ विनोद शिवकुमार सह माजी मेळघाट क्षेत्र संचालक एम.एस रेड्डीही जबाबदार आहे.

    अचलपूर (Achalpur).  हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. यामध्ये वरीष्ठ अधिकारी डीएफओ विनोद शिवकुमार सह माजी मेळघाट क्षेत्र संचालक एम.एस रेड्डीही जबाबदाार आहे. त्यामुळे रेड्डी यांनाही सह आरोपी करून तत्काळ अटक करण्यात यावी. अन्यथा बेलदार समाज राज्यभर आंदोलन करेल असा इशारा बेलदार समाज संघटनेचे अध्यक्ष राजु साळुंके यांनी दिला आहे.

    मेळघाटातील हरीसाल वनपरीक्षेत्र अधिकारी ही आपल्या कामगारीमुळे लेडी सिंघम म्हणून मेळघाटमध्ये ओळखल्या जात होती. तसेच बेलदार समाजातील एक कर्तबगार महिला अधिकारी म्हणून बेलदार समाजासाठी दिपाली ही अभिमानाची बाब होती. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाळा कंटाळून दिपालीने आत्महत्या केली आहे. या घटनेमध्ये राज्यभरातील बेलदार समाजामध्ये संतापाची लाट आहे. या घटनेनंतर आरोपी वरीष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांना निलंबित करून गुन्हा देखाली दाखल केला आहे.

    परंतु या आत्महत्येला मेळघाट क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी देखील जबाबदार असल्याचे बेदलदार समाजाचे म्हणणे आहे. त्यामुळे रेड्डी यांनाही सह आरोपी करून तत्काळ अटक करण्याची मागणी बेलदार समाजाकडून होत आहे. या संदर्भातील निवेदनही बेलदार समाज संघटनांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले आहे. या निवेदनतून रेड्डी यांच्यावर कारवाई झाली नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही राजु सोळंके देण्यात आला आहे.