dharni ghungru bajar fire

आग नेमकी कश्यामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही लाग लागली नाही असे काही व्यापाऱ्यांचे  म्हणणे आहे. रात्री दुकान बंद करताना व्यापारी आपआपल्या दुकानातील विजेचे मेन स्विच बंद करून घरी जात असल्याचे व्यापार्यांनी सांगितले

  • व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
  • प्रशासनाने केला धारणीतील घुंगरू बाजार रद्द

धारणी. शहरातील कपडा मार्केटला शुक्रवार २० नोव्हेंबरला पहाटे चार वाजता अचानक आग लागली. या भीषण आगीत पंधरा दुकाने जळून खाक झाली. दिवाळीच्या घुंघरू बाजारासाठी व्यवसायिकांनी कोट्यवधी रुपयांचे विविध प्रकारचे साहित्य विक्रीकरीता दुकानात भरून ठेवले होते. शुक्रवारी घुंघरू बाजार असल्याने हजारो आदिवासी तापी नदीच्या पलिकडील मध्यप्रदेश व मेळघाटातुन हजारो आदिवासी शहरात येणार होते. त्याकरीता व्यापार्यांनी बाजाराची पूर्ण तयारी करून ठेवली होती.

आग नेमकी कश्यामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही लाग लागली नाही असे काही व्यापाऱ्यांचे  म्हणणे आहे. रात्री दुकान बंद करताना व्यापारी आपआपल्या दुकानातील विजेचे मेन स्विच बंद करून घरी जात असल्याचे व्यापार्यांनी सांगितले. घटना स्थळापासून मे. रसिक पटेल यांच्या मालकीचा पेट्रोल पंप अवघ्या शंभर मिटरवर आहे. त्या समोरील बुर्हाणपुर जलेबीवाला दुकानात सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. सुदैवाने आगीचे आगडोंब पेट्रोल पंपाच्या दिशेने उसळले नसल्याने मोठा अनर्थ टळला. धारणीकर पहाटे साखरझोपेत असताना हे अग्नीतांडव झाल्यामुळे कोणालाही दुकानातुन आपला माल आगीपासुन वाचविता आला नाही. पहाटे नगर पंचायतीचा बंब घटनास्थळी दाखल झाला तरी तो पर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.

dharni fire

अचलपूर, चांदुर बाजार आणि मध्यप्रदेशातील खंडवा येथुन अग्निशमन दल बोलविण्यात आले. तो पर्यंत पंधरा दुकानाची राखरांगोळी झाली होती. या आगीचा सर्वात जास्त फटका कपडा व्यवसाईकांना बसला. मेळघाटाचे आमदार राजकुमार पटेल, प्रकल्प अधिकारी डॉ. मिताली सेठी व आयपीएस निकेतन कदम यांनी तातडीने प्रशासनाला सक्रीय करून सकाळी सात वाजता आग आटोक्यात आणली.