अमरावतीत हॉटेल इम्पेरियाला आग; व्यावसायिकाचा गुदमरून मृत्यू

राजापेठ परिसरात पहाटे तीनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि आगीने हॉटेल परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. त्यामुळे नागपूर येथील GTPL चे दिलीप ठक्कर (Dilip Thakkar) यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

  अमरावती (Amravati) :  शहरातील राजापेठ परिसरात (Rajapeth area) असलेल्या हॉटेल इम्पेरियाला (Hotel Imperia) आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आग (Fire) लागली. या आगीत एका व्यक्तीचा गुदमरून मृत्यू (person died of suffocation) झाला असून राजापेठ पोलिसांच्या (Rajapeth police) सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला व इतर नागरिकांचे प्राण वाचले.

  राजापेठ परिसरात पहाटे तीनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि आगीने हॉटेल परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. त्यामुळे नागपूर येथील GTPL चे दिलीप ठक्कर (Dilip Thakkar) यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

  शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. मिळलेल्या माहितीनुसार दिलीप ठक्कर हे एका केबल टीव्ही कंपनीमध्ये विदर्भ विभागाचे प्रमुख होते. त्याच कामाच्या संदर्भात ते अमरावतीमध्ये आले होते. काम आटोपल्यानंतर रात्री ते राजापेठ परिसरात असलेल्या हॉटेल इम्पेरिया येथे आराम करण्यासाठी गेले. त्याच दरम्यान पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हॉटेलला आग लागली. आगीमुळे संपूर्ण हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात धुर पसरला. या धुरामुळेच ठक्कर यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

  हॉटेल इम्पेरियाच्या समोरच राजापेठ पोलीस ठाणे असून रात्री पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांच्या पथकाला आग लागल्याचे दिसले असता त्यांनी अग्निशामक विभागाला याची लगेच माहिती दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यात आणि आग आटोक्यात आणली. या आगीत हॉटेलमध्ये मुक्कामी असेलेले इतर पाच व्यक्ती मात्र सुदैवाने बचावले, मात्र या आगीत ठक्कर यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

  ठक्कर यांच्या मृत्यूची बातमी समजताच शहरातील अनेक केबल ऑपरेटरनी धाव घेतली. सध्या त्यांच्या मृतदेह शवविच्छेदन करिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला असून राजापेठ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

  हॉटेल इम्पेरियाचे फायर ऑडिट झाले आहे की नाही? आग नेमकी कशामुळे लागली याचाही तपास राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे करत आहेत. तीन चार दिवसापूर्वीच अमरावती बडनेरा मार्गावरील एमआयडीसीतील नॅशनल केमिकल पेस्टिसाइड या कंपनीला भीषण आग लागली होती. त्यानंतर लगेच आज पहाटे या हॉटेलला आग लागली. हॉटेल उद्योग आणि व्यवसायिक इमारतीला फायर ऑडिट करण्याची सक्ती असताना अमरावती शहरात मात्र अनेक हॉटेल, रुग्णालये व व्यावसायिक इमारतींचे फायर ऑडिट झालेलं नाही याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष असल्याचं बोललं जात आहे.