navneet rana

खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करत मोर्चा काढला. यावेळी त्यांनी दोन तास रस्ता रोको आंदोलन केले. सरकारविरोधात घोषणाबाजी करत युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

अमरावती : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. नुकसानग्रस्त (Farmers) शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळावी, तसेच कोरोना काळात वाढीव वीज बिले (Light Bill) निम्मे माफ करण्यात यावीत यासाठी आमदार रवी राणा (Ravi Ranca ) यांनी आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने अटक करण्यात आले आहे. त्यांच्या सुटकेसाठी पत्नी खासदार नवनीत राणा या सलग दुसऱ्या दिवशी रस्त्यावर उतरल्या आहेत.

खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करत मोर्चा काढला. यावेळी त्यांनी दोन तास रस्ता रोको आंदोलन केले. सरकारविरोधात घोषणाबाजी करत युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

नवनीत राणा म्हणाल्या की, रवी राणा यांनी जामीन घेण्यास नकार दिल्याने 20 शेतकऱ्यांसह रवी राणा तीन दिवसांपासून अमरावती कारागृहात आहेत. आमदार राणा कारागृहात असून प्रशासनाने दखल घेतली नसल्याचां आरोप केला. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आज शेतकऱ्यांना घेऊन मुंबई रवाना होणार असून उद्या मातोश्री समोर आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.