कुत्रा आडवा आल्याने फोर व्हिलरचा भीषण अपघात; इलेक्ट्रिक डीपीला धडक

लॉकडाऊनमुळे अनेक वाहन चालक पोलीसांच्या भितीपोटी रात्रीला वाहन चालवतात. चारचाकी वाहनाने भुसावळ वरून नागपूरला जाणारे दोन इसमांचा रात्रीच्या सुमारास आसेगाव अमरावती टी पॉइँट जवळील इंडियन ऑईल पेट्रोलपंप जवळ अपघात झाला.

    दर्यापूर (Daryapur).  लॉकडाऊनमुळे अनेक वाहन चालक पोलीसांच्या भितीपोटी रात्रीला वाहन चालवतात. चारचाकी वाहनाने भुसावळ वरून नागपूरला जाणारे दोन इसमांचा रात्रीच्या सुमारास आसेगाव अमरावती टी पॉइँट जवळील इंडियन ऑईल पेट्रोलपंप जवळ अपघात झाला. कुत्रा आडवा आल्याने इलेक्टीक डिपीला जाऊन वाहन धडकल्याने अपघात झाला. ही घटना शुक्रवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास घडली.

    घटनेसंदर्भात पेट्रोल पंपावरील असलेल्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच यांनी पोलीस स्टेशनला संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाहनांमध्ये असलेले जखमी अविनाश केशवसोनकुसे व निलेश मोहन भगत दोन्ही रा. नागपूर यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयत दाखल केले.