women harashment

माहेरवरून पैसे आणण्यास नकार देणाऱ्या एका विवाहितेच्या तोंडात रूमाल कोंबून तिच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर करून अमानुष छळ केला.

  • पतीसह एका महिलेविरुद्ध गुन्हा

अमरावती. माहेरवरून पैसे आणण्यास नकार देणाऱ्या एका विवाहितेच्या तोंडात रूमाल कोंबून तिच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर करून अमानुष छळ केला. पीडितेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी पती उमेश विष्णुपंत ढगे (४६) व सासु (६२, दोन्ही रा. अशोकनगर, मोर्शी) यांचेविरुद्ध मारहाणीसह शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गुन्हा नोंदविला आहे.

घरगुती कारणावरून छळ

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी पती व सासू हे संगमनत करून वडिलांकडून पैसे आणण्याचा तगादा लावत होते. लहानसहान कारणावरून वाद करीत शारीरिक व मानसिक छळ करीत होते. याबाबत तिने पतीविरुद्ध एकवेळा पोलिसात तक्रार नोंदविली आहे. दरम्यान सासु-सुनेच्या घरगुती कारणावरून वाद झाला. त्यावेळी सासूने पकडून ठेवले आणि पतीने तोंडात रूमाल कोंबून नाकावर हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. पीडितेची तक्रार आणि तिच्या मारहाणीच्या वैद्यकीय अहवालावरून राजापेठ पोलिसांनी पतीसह सासुविरुद्ध गुन्हा नोंदविला.