गणरायांच्या मूर्तीसोबतच कुंडी आणि रोपटे मोफत; गणेशोत्सवात पर्यावरण वाचविण्याचा संदेश

    अमरावती (Amravati): गणपती बाप्पा आज सगळीकडे विराजमान झाले आहेत. राज्यात मोठ्या धुमधडाक्यात गणपती उत्सव साजरा केला जातो. मात्र, या हा उत्सव साजरा करित असतांना जलप्रदूषण, वायुप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. परिणामी निसर्गावर मोठा परिणाम होता.

    निसर्गाची हानी होऊ नये, यासाठी अमरावती येथील नीलेश कंचनपुरे या गणपती विक्रेत्याने गणपती उत्सवात चांगला संदेश दिला आहे. त्यांच्याकडे पूर्णपणे मातीच्या गणपती मूर्ती असून यात त्या गणपती सोबत ग्राहकांना एक झाड सुद्धा व कुंडी भेट देण्यात येत आहे.