प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

टाळेबंदीचा फायदा उचलून शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. याच पार्शभूमीवर चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड येथून पोलिसांनी नकली कपाशी बियाने जप्त केले आहे. या प्रकरणी दोन जणांना अटकही करण्यात आली आहे.

    अमरावती (Amravati).  टाळेबंदीचा फायदा उचलून शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांची विक्री (selling bogus seeds to farmers) करणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. याच पार्शभूमीवर चांदूर रेल्वे तालुक्यातील (Chandur railway taluka) मांजरखेड (Manjarkhed) येथून पोलिसांनी नकली कपाशी बियाणे जप्त केले आहे. या प्रकरणी दोन जणांना अटकही करण्यात आली आहे.

    स्थानिक पोलिस व कृषी विभागाच्या पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई रविवारी केली आहे. या कारवाईत २९ हजार १४६ रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे, तर या प्रकरणातील एक आरोपी फरार (accused has absconded) झाला आहे.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २३ मे रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अमरावती कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी उज्वल आगरकर, अमरावती जि. प. चे जिल्हा कृषी अधिकारी अजय तळेगावकर, कृषी विभागाचे अनंत मस्करे, दादासो पवार तसेच चांदूर रेल्वे पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गणेश मुपडे, पोलिस कॉन्स्टेबल शरद खेडकर या पथकाने चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड (कसबा) येथे जाऊन एका ठिकाणी झडती घेतली.

    आरोपी साहेबराव मेथाजी राठोड (वय ३२ वर्ष) रा. मांजरखेड याच्याकडून ३०२८-४ जी अशा नावाचे प्रत्येकी ४५० ग्रॅमचे २ पॅकेट, आर कॉट ६५९-४ जी नावाचे प्रत्येकी ४५० ग्रॅमचे २ पॅकेट, सिकन्दर प्लस प्रत्येकी ४५० ग्रॅमचे २ पॅकेट व विजया हायब्रीड कॉटन सीड प्रत्येकी ४५० ग्रॅमचे २ पॅकेट असे एकुण ८ पॉकेट किंमत ६ हजार १३६ रूपयांचे अनधिकृत बियाणे जप्त करण्यात आले आहे.

    या कारवाईत आरोपी रामफळ पूनिया (वय ५७ वर्ष) रा. मांजरखेड (मूळ रा. हरियाणा) या व्यक्तीकडे जोराड पॉवर विश्वास सीड या नावाचे ४५० ग्रॅमचे २ पॅकेट किंमत २३ हजार १० रूपये आढळून आले. दोन्ही आरोपींना मुद्देमालासह चांदूर रेल्वे पोलिस स्टेशन येथे आणण्यात आले. यानंतर आरोपी साहेबराव राठोड याने लेखी दिलेल्या जबाबानुसार त्यांना बियाणे दिनेश दुबे (वय ३२ वर्ष) रा. बासलापूर याने ८०० रुपये प्रति पॅकेट या दराने विक्री करिता दिले होते.

    यावरून आरोपी साहेबराव मेथाजी राठोड, रामफल पुनिया व दिनेश दुबे यांनी बनावट वेस्टन छापलेले अनधिकृत कपाशी बियाणे विक्रीकरिता शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या हेतूने आणले होते. त्यामुळे त्यांच्यावर भादंवी कलम ४२०, ४६३, ४६५, ४६८, ४७१ सहकलम बियाणे नियम १९६८ चे कलम ७, ८, ९, १०, सहकलम पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ चे कलम १५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय गणेश मुपडे, पो.कॉ. शरद खेडकर करत आहे. या प्रकरणाची फिर्याद चांदूर रेल्वे पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रकाश खोबरखेडे यांनी दिली आहे.